कोथरुड

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर कांबळे मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर

महा-ई-सेवा केंद्राचेही उद्घाटन

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर व महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. किशोर कांबळे मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर, नगरसेवक दिपक मानकर, नगरसेवक सचीन दोडके, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले, स्वप्निल दुधाने, योगेश मोकाटे, हर्षवर्धन मानकर, संदीप बालवडकर, ज्योती सुर्यवंशी, सिताराम तोंडे, कैलास मकवान, राजेश गायकवाड, निलेश शिंदे, मधुकर भगत, वैभव कौठुळे, संगीता मोहोळ, दिपा मोहीते, प्रेमलता जैन, संतोष मोहोळ, संजय चव्हाण, संतोष चव्हाण, शेखर तांबे, अज्जुभाई शेख, ओंकार पवार, संतोष मोरे आदी उपस्थित होते.

Img 20201213 wa0074

या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. ओम ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले होते. कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असल्याने राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन सरकारकडून या आगोदरच करण्यात आले होते. या आवाहनाला साथ देत पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तरुणांनी उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभागी होत रक्तदान केल्याचे किशोर कांबळे यांनी सांगितले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये