राज्यात दौरे करा, राज ठाकरेंना चंद्रकांत पाटलांचा सल्ला
पुणे : आपला पक्ष वाढवायचा असेल तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात दौरे करायला हवेत, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचे मनसेने ठरविले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी जनतेचा प्रतिसाद किती आहे याचा अंदाज दौऱ्यांमधून येतो, याकरिता राज ठाकरेंनी दौरे केले पाहिजेत असे ते म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकांत भाजप विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत होणार आहे. दोन्ही बाजू सज्ज झाल्या आहेत. यातच मनसेही निवडणूक रिंगणात उतरते आहे. भाजप नेत्यांनी मनसे बद्दल सौम्य भूमिका ठेवली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यातून तेच ध्वनित होते.