महाराष्ट्र

लसीकरण मोहीमेत पत्रकारांचा समावेश करावा – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत पत्रकारांचा प्राधान्याने समावेश करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजपर्यंत अनेक पत्रकार मोठी जोखीम पत्करून वार्तांकन करीत आहेत. यातील काहींना साथीचा तडाखा बसला तरीही डगमगून न जाता प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारांनी काम चालू ठेवले आहे.कामाच्या निमित्ताने त्यांना विविध ठिकाणी जावे लागते, हे लक्षात घेऊन पत्रकारांनाही लस द्यावी. वैद्यकीय स्टाफ, पोलीस यांच्या इतकेच जोखमीचे काम पत्रकारांना केले आहे, असे आमदार शिरोळे यांनी म्हटले आहे.

Img 20210116 wa0007
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये