महाराष्ट्र

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवणारच, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचं बेळगावकडे कूच

कोल्हापूर : बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावकडे मार्गक्रमण केलं आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावकडे मार्गक्रमण केलं आहे.

(Kolhapur Shiv Sainiks march towards Belgaum in front of Belgaum Municipal Corporation)

बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे तमाम शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भगवा फडकवणारच, असा निर्धार शिवसेनेने केला आहे.

Img 20210116 wa0007

शिनोळी या गावातून भगवा झेंडा घेऊन शिवसैनिकांनी बेळगावकडे मार्गक्रमण केलं आहे. मात्र शिवसैनिकांना कर्नाटक पोलीस परवानगी देणार का?, असा मोठा प्रश्न आहे. कारण मागील काही आंदोलने, मोर्चे पाहता मराठी भाषिकांना तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात कर्नाटक पोलिस दडपशाही करत आलेलं आहे.

चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून शिवसेनेचे आंदोलन सुरु होणार आहे. दुपारच्या दुपारी 12 च्या सुमारास शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु त्याअगोदर कर्नाटक पोलिस सतर्क झाले आहेत.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असं मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दोन दिवसांपूर्वी राऊत बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरीही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

बेळगवाच्या जनतेने 70 वर्षे फार संघर्ष केला. प्रसंगी हौतात्म्य पत्करलं. पोलीस केसेस झाल्या, डोकी फुटली. त्यामुळे आता या प्रश्नावर उद्धव ठाकरे येडियुरप्पांशी चर्चा करतील. या प्रश्नावर सध्या तातडीने एक बैठक होऊन काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच या भागातील मराठी भाषिक जनता सूटकेचा श्वास सोडेल. विशेषत: मराठी भाषा, संस्कृती, साहित्य या संदर्भातील ही लढाई आहे. हे टिकायला हवं आणि ते टिकेल असं मला वाटतं. कारण देशभरात आणि जगभरात मराठी भाषिक लोक राहतात. राजकारणाच्या दृष्टीने देखील त्यागोष्टी महत्त्वाच्या असतात, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये