पुणे शहर

वर्षा गायकवाड हाय हाय ; खासगी शाळांच्या फी दरवाढी विरोधात आंदोलन

पुणे : पुणे शहरातील खासगी शाळांनी मनमानी करत फी वाढ केली असून त्या विरोधात आज पालक संघटनेकडून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना बालभारती येथे कार्यक्रमासाठी आले असताना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत गायकवाड यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. Movement against private school fee hike

खासगी शाळांच्या फी दरवाढीविरोधात सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर ३० जानेवारी रोजी मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याच पालक संघटनेच्या अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी यावेळी सांगितल.

बालभारती बाहेर वर्षा गायकवाड यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आल्याने उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते व पालक संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाचीचा प्रकार घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटविला.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये