बाबा चमत्कार साकारलेले प्रसिद्ध अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे वयाच्या८३ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले आहे. झपाटलेल्या या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली होती.झपाटलेला आणि झपाटलेला टू या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका पाहायला मिळाली होती.(Famous actor Raghavendra Kadkol, who performed Baba miracle, passed away)
राघवेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीत काम करत होते त्यांनी अश्रूंची झाली फुले रायगडाला जेव्हा जाग येते या सारख्या अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून राघवेंद्र कडकोळ यांनी कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यात येण्यामागे देखील एक कथा आहे त्यांना नौदलात भरती व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी परीक्षा देखील दिली होती परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना जागेवर पाठवण्यात आले सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांची पुन्हा मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यात त्यांच्या कानात असल्याचे कारण देत त्यांना पुन्हा आल्यानंतर राघवेंद्र यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली उदरनिर्वाहासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून नोकरी सरकारी नोकरी मिळवली.
अश्रूंची झाली फुले या नाटकातील धर्मपाल ही भूमिका राघवेंद्र यांच्याकडे आली एक कानडी व्यक्ती मराठी कसे बोलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्मप्पा त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक देखील झाले धोंडी, देवदाशी पण, कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते यासारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यांच्या मुळे बालगंधर्व जीवन पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तकही लिहिले.



