पुण्यातील मेट्रो 2 प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु- देवेंद्र फडणवीस

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील विकास कामांच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुण्यातील मेट्रो 2 प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. केंद्राच्या पुढच्या अर्थसंकल्पात मेट्रो 2 प्रकल्पासाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.(We will try to get funds from the Central Government for the Metro 2 project in Pune – Devendra Fadnavis)
“पुणे मेट्रो संदर्भात 22 किलोमीटरचा पहिला टप्पा यावर्षीच सुरु करण्यात येईल. उर्वरीत 10 किमीचा मार्ग 2022 मध्ये सुरु करण्यात येईल. मेट्रोचा दुसरा टप्पा हा 60 किमीचा आहे. या प्रकल्पाबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला दिली तर आम्ही पाठपुरावा करुन पुढच्या बजेटमध्ये त्याचा निधी मिळेल असा प्रयत्न करु. पुणे मेट्रो 2 साठी निधी मिळावी, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून पुणेकरांना दिलं.

महापौरांनी मला आढावा घेण्यासाठी निमंत्रित केलं होतं. मी मुख्यमंत्री असताना विविध योजना मंजूर केल्यात. 24 / 7 पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती”, असं फडणवीस यांनी सांगितलं
“पुणे महापालिकेने रिव्हर फंड डेव्हलोपमेंटचा अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. आपल्याकडे अतिशय सुंदर नदीपात्र आहे. त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर आराखडा महापालिकेने तयार केला आहे. महापालिकेने सरकारकडे एसपीव्हीची परवानगी मागितली आहे. ती परवानगी अजून मिळाली नाही. मात्र, मी देखील सरकारला यासाठी विनंती करेन. मे पर्यंत या रिव्हर प्लांट डेव्हलोपमेंटचं काम सुरु झालं पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन महापालिकेने केलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.



“एक अत्यंत महत्त्वकांशी प्रोजेक्ट जो पुण्याला पर्यावरण पुरक शरह करणार आहे. शंभर टक्के सिव्हेज ट्रिटमेंट, ज्यादृष्टीने मुळा-मुठाचा जायका प्रोजेक्ट संकल्पित करण्यात आला. जपानच्या जायकाने या प्रोजेक्टसाठी शंभर टक्के फंडींग दिले आहेत. यामध्ये 11 एसटी तयार करायचे आहे. यातील जे सांडपाणी नदीपात्रात जातं ते पूर्णपणे ट्रिट होईल. पुणे हे पहिलं शहर होईल, जे शंभर टक्के सिव्हेजला ट्रिट करणार आहे. या प्रोजेक्ट संदर्भात मागच्या काळात निविदा काढल्या होत्या. मात्र, त्या निविदा खूप चढ्या दराने आल्याने रद्द झाल्या”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
“केंद्र सरकारने नमोमी गंगेच्या नावावर अशा प्रकारच्या नदीच्या पुनर्जिवणासाठी नॉर्म्स तयार केले आहेत. त्यामध्ये 15 वर्षांचे मेंटेनन्स कम्पशन केलं आहे. त्यामुळे फेब्रुवारीत टेंडर काढून जूनपर्यंत काम सुरु होईल”, असं फडणवीस म्हणाले



