गुंठेवारी कायदा लागू केल्याबाबत अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे आभार; अनेक नागरिकांचे प्रश्न सुटणार : दिपाली धुमाळ

पुणे : गुंठेवारी कायद्यान्वये 31 डिसेंबर 2020 पर्यंत ची सर्व अनाधिकृत बांधकामे आता अधिकृत होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची घरे अधिकृत होऊन त्यांना आता बँका कर्ज पुरवठा करू शकतील. त्यामुळे ज्यांनी खाजगी कर्ज काढून बांधकामे केलेली आहेत, अनधिकृत बांधकामे केली असल्याने त्यांना कोणत्याही बँकाकडून बांधकामासाठी कर्ज दिले जात नव्हते तसेच भरमसाठ व्याजाने कर्ज काढून आपली बांधकामे केली आहेत. आता ही बांधकामे अधिकृत झाल्याने कोणतीही बँक या सर्व सामान्य नागरिकांना कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करू शकतील. त्यामुळे महा विकास आघाडी सरकारने केलेल्या या कायद्यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

दिपाली धुमाळ म्हणाल्या, शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात कौतुक व आभार व्यक्त होत आहे. या निर्णयासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महाविकास आघाडीच्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगला निर्णय घेतला आहे त्या बद्दल अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवक व पदाधिकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून या विषया बाबतीत सरकारकडे पाठपुरावा केला होता व त्याला यश मिळाले असल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.



