पुणे शहर

कोथरुड मध्ये होणाऱ्या एक्झिबिशन सेंटर मध्ये वॉर म्युझियमचा समावेश करण्याची अल्पना वरपे यांची महापौरांकडे मागणी..

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गालगत स. नं ७० येथे ६.२७ एकर जागेमध्ये करण्यात येणाऱ्या एक्झिबिशन सेंटर मध्ये ग. दि. माडगुळकर स्मारक, प्रायोगिक रंगभूमी तसेच अॅक्वेरीयम तयार करण्यात येणार असून त्यामध्ये वॉर म्युझियमचा ही समावेश करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली आहे. Alpana Warpe’s demand to the Mayor to include the War Museum in the proposed exhibition center in Kothrud.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यातून पर्यटकांना आकर्षित करेल असेल एक्झिबिशन सेंटर हा महत्त्वकांक्षी प्रकल्प महापालिकेच्या वतीने महात्मा सोसायटी जवळ महामार्गालगत उभारण्यात येणार आहे. हे क्षेत्र मोठे असल्याने सदर जागेमध्ये भारतीय सैन्याचे शौर्याचे प्रतिक असलेले वॉर म्युझियमचा देखील समावेश करण्यात यावा अशा मागणीचे पत्र अल्पना वरपे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिले असून या मागणीला मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वरपे यांनी सांगितले.

Img 20210319 wa0097

वरपे म्हणाल्या की, या वॉर म्युझियम च्या माध्यमातून
नागरिकांना आपल्या शूर सैनिकांच्या शौर्या विषयी, भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलां विषयी
माहिती मिळू शकेल व तरुण पिढीला देश सेवेची प्रेरणा जागृत होईल.  सदर परिसरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आहे. त्यामुळे या वॉर म्युझियमला नक्कीच विशेष महत्त्व असणार आहे. सदर वॉर म्युझियम म्हणजे आजी माजी सैनिकांचा पुणे महानगरपालिके तर्फे केलेला एक प्रकारे सन्मानच असणार आहे. त्यामुळे या मागणीचा विचार व्हावा असे त्यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये