कोविड – १९ प्रतिबंधित लसीकरण केंद्र कर्वेनगर मध्ये सुरु ; लक्ष्मी दुधाने यांच्या पाठपुराव्याला यश..

कर्वेनगर : नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या संकल्पनेतून कर्वेनगर मध्ये विकसित विकसित करण्यात आलेल्या ई-लर्निंग स्कुल च्या इमारतीमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे केंद्र सर्व्हे नंबर ९ , वेदांत नगरीजवळ, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल शेजारी, १०० फुटी डी पी रोड, कर्वेनगर येथे सुरु केले गेले आहे. covid vaccination centers started in Karvenagar; Success in the pursuit of Lakshmi Dudhane ..
या केंद्रामुळे कर्वेनगर मधील नागरिकांची लसीकरणाची चांगली सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परिसरातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन लक्ष्मी दुधाने यांनी केले आहे.
सर्व्हे नंबर 9 मधील वेंदात नगरीजवळील 100 फुटी डी.पी.रोड लगत 4 एकर जागेमध्ये पुणे महानगरपालिके मार्फत नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या सहयादी निधीमधून पुणे शहरातील सर्वात मोठे ई-लर्निंग स्कुल विकसित करण्यात आले आहे. या स्कुलचे काम पूर्ण झाले असून कोरोना स्थितीमुळे याचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. तोपर्यंत या सर्व सोई-सुविधांयुक्त असलेल्या स्कुल च्या ईमारतीमध्ये पुणे मनपा प्रशासनाने कोरोना लसीकरण केंद्र सुरु करावे, याबाबत दुधाने यांनी महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. याबाबत आयुक्तांनीही त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन आजपासून लसीकरण केंद्र सुरु केले.

या केंद्रामुळे नागरिकांची चांगली सोय झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही लस जास्तीत जास्त लोकांना मिळणे ही सध्याची मुख्य गरज आहे. लोकांच्या हितासाठी हा पाठपुरावा आणि त्यातून मिळालेले हे यश आमच्यासाठी समाधानकारक असल्याचे लक्ष्मी दुधाने यांनी म्हंटले आहे.






