एरंडवण्यात रक्तदानाचा महायज्ञ ; मनसे आणि राम बोरकर मित्र परिवाराकडून आयोजन

पुणे : कोथरुड एरंडवणा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राम बोरकर मित्रपरिवार यांच्या वतीने शिरीष तुपे यांच्या 28 व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 146 जणांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले तर पाच नागरिकांनी प्लाजमा दान करण्यासाठी नोंदणी केली. प्रत्येक रक्तदात्यांस कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल शिदोरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ,मनसे नेते बाबु वागसकर, मनसे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे ,अभिनेते राहुल सोलापूरकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अजय शिंदे, सरचिटनीस किशोर शिंदे , रणजित शिरोळे, नगरसेवक दिपक पोटे,जयंत भावे पूनित जोशी , प्रल्हाद गवळी प्रशांत मते ,प्रशांत कनोजीया , राजेंद्र वेडे पाटील ,सुनील कदम संजय काळे आदी उपस्थित होते.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना संदर्भामध्ये प्रबोधन करणे आवश्यक असून टेस्टिंग करण्याची प्रक्रिया वाढवण्यासाठी लॅब सुसज्ज करणे व आधुनिक मशीन वापरणे आवश्यक आहे. तसेच ऑक्सीजन बेड व नागरिकांची सुविधा होईल असे हॉस्पिटल तयार करणे आवश्यक आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, नागरिकांची गरज ओळखून नागरिकांना मदत होईल असे उपक्रम सर्वांनी हाती घेणे आवश्यक आहे. ऑक्सीजन बेड उभारण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत पालिका स्तरावरती केली जाईल.
राम बोरकर म्हणाले, शिरीष तुपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दर वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येते परंतु यावर्षी रक्तदानाची गरज पाहता हे शिबिर सातत्यपूर्ण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्या दिवशी 146 रक्तदात्यांनी रक्तदान करून याची सुरुवात केली आहे. पुणेकरांना आवाहन करण्यात येते की या दररोज सुरू असलेल्या रक्तदान उपक्रमांमध्ये आपला देखील सहभाग नोंदवा.
सुमारे एक लाख रक्तदान संकलन करण्यासाठी राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने संकल्प करण्यात आला आहे. सर्व पक्षिय कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
यावेळी नागेश जगताप,जयंत देवरे,दत्तात्रय बिराजदार सुभाष येनपुरे,राजु सातपुते,राजेश शिगवण,गणेश शेडगे,प्रदिप ठोंबरे,कुंदन सागवेकर,श्रीकांत कुंबरे,विलास सुपेकर,प्रकाश कुडले,विकास शिगवण,चेतन इंगवले,कपिल काळे,ॲड. चंदन सागवेकर,महेश पवार,रोहित सातपुते,प्रथमेश सागवेकर,धिरज पवार,किरण शिंदे,अभिषेक जगले,स्वामी ठोंबरे,महादेव बिराजदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहरातील वाढत्या कोरोना १९ च्या रूग्णांन साठी रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर असेच पुढे एक महीना चालू ठेउन रूग्णांना प्लाझ्मा मिळण्यासाठी मनसेचा निर्धार असणार आहे त्या साठी प्लाझ्मा दान करणाऱ्या नागरीकांनी मनसे कार्यालय एरंडवणे येथे दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान व प्लाझ्मादान करण्यासाठी यावे “म्हाद्याचे रक्त महंमद्याला रक्ताची गरज समद्याला” असे आवाहन राम बोरकर यांनी केलेले आहे .



