महाराष्ट्र

आज संध्याकाळी ८ पासून १ मे पर्यंत राज्यात आणखी कडक निर्बंध, सरकारकडून नवीन नियम लागू ..

मुंबई : कडक निर्बंध लागू असताना देखील राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढतच असल्याने आज गुरुवार दिनांक 22 एप्रिल  संध्याकाळी ८ वाजल्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत असे सांगण्यात आले आहे. This evening from 8 to 1 May, more strict restrictions in the state, new rules will be implemented by the government.

राज्यात कडक निर्बंध लागू असून देखील दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. रुग्ण संख्या कमी होताना दिसत नसल्याने राज्य सरकारने आता आणखी कडक नियम लागू केले आहे.  

राज्य सरकारच्या आदेशानुसार हे आहेत नवीन नियम.

१. सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के
उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील
कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम
करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार
या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी
वाढवता येणार आहेत.

२. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात
नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण
असेल तर प्रवेश दिला जाणार.

३.लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित
राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2
तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार.
या नियमांचे उल्लघन केल्यास 50 हजार
रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
४. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त
५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात
आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास १०
हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

Img 20210223 wa0156

५. लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक
सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50
टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता
येणार.
६. खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ
अत्यावश्यक लोकांसाठीच.

सकाळी  ७ ते ११ हे सुरू राहणार     किराणामालाची दुकाने, भाजीविक्री, बेकरी, मटण, चिकन शॉप, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये