पुणे शहर

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे कोथरूडमध्ये पेट्रोलपंपासमोर आंदोलन

पुणे : कोथरुड ब्लॉक काँगेसच्यावतीने  पेट्रोल- डिझेलच्या अन्यायी दरवाढी विरोधात कोथरुड येथील लोढ्ढा पेट्रोल पंपावर  व कर्वे रोड दिक्षीत पंपावर मोदी सरकार विरोधात कोथरुड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या येथे निषेध आंदोलन करण्यात आले.(Congress protests in front of petrol pumps in Kothrud against petrol-diesel price hike)

यावेळी नगरसेवक चंदुशेठ कदम, कोथरुड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय खळदकर,उमेश कंधारे,शिवा मंत्री महिला बाॅल्क अध्यक्षा मनिषा करपे,संदीप मोकाटे, राजा साठे,किशोर,किशोर  मारणे,युवक ब्लॉक अध्यक्ष प्रताप शिळिमकर,भगवान कडू,आण्णा गोसावी बाळासाहेब शेडगे अजित ढोकळे,कान्हु साळुंखे ,मामा गायकवाड ,शारदा वीर,गणेश मारणे, युवराज मदगे, निलेश वाघमारे, हरी सणस, समीर गांधी शिवाजी सोनार, सुरेश तनपुरे,विवेक कडू ,मोहन आवळे, रवींद माझीरे  आदी उपस्थित होते.    

Img 20210522 wa0203

नगरसेवक रामचंद्र कदम म्हणाले, कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून पेट्रोल – डिझेल च्या दरा मध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोदी सरकारने तातडीने ही दरवाढ कमी करावी.  व नागरिकांना दिलासा द्यावा.

विजय खळदकर म्हणाले, पेट्रोल डिझेल ची दरवाढ हे मोदी सरकारचे मोठे अपयश आहे. यामुळे सामान्य माणसाचे हाल होत आहेत. पेट्रोल चा दर शंभरी पार गेला आहे. तर डिझेल चा दर ९० रुपयांच्या वर गेला आहे. सर्व सामान्य जनतेसाठी तातडीने पेट्रोल डिझेल चे दर कमी झालेच पाहिजे.                                                                                                                                                      

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये