कोथरूडमधील कोविड योद्धयांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

पुणे : कोरोना महामारीच्या काळात आपल्या सेवेने मानवतेचे उदाहरण ठेवलेले डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, मनपा कर्मचारी सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते यांनी केलेल्या कार्याचे कोणतेही मोल होऊ शकत नाही त्यांचे मनोबल वाढावे,त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक नक्कीच झाले पाहिजे. याच भावनेतून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्थानिक नगरसेविका छाया अजय मारणे यांच्यावतीने कोथरूडमधील कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका वासंती जाधव मंजुश्री खर्डेकर,अल्पना वरपे,माधुरी सहस्त्रबुद्धे,स्वप्नाली सायकर,डॉ संदीप बुटाला,अनिता तलाठी,हर्षदा फरांदे,सुरेखा जगताप,दिलीप उंबरकर,संदीप मोरे, अभिजित राऊत,पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझीरे,रणजित हारपुडे संतोष घारे,मुकुंद शिर्के,कमलाकर भोंडे,सुरेश काळे,सुषमा तेलकर आदी उपस्थित होते.




