मुंबईसह ‘त्या’ जिल्ह्यांनी कोणते प्रस्ताव दिले? : महापौर मुरलीधर मोहोळ यांचा राजेश टोपे यांना प्रश्न

पुणे : ऐकावे ते नवलच आहे. मुंबई आणि इतर जिल्ह्यात शिथिलता देताना त्यांच्याकडून कोणते प्रस्ताव दिले होते? प्रस्ताव मागवून शिथिलता द्यायची? अशी प्रक्रिया कधी सुरू झाली? आम्ही पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मागणी करत आलो आहे. पालकमंत्री सकारात्मकता दाखवतात, मात्र मुख्यमंत्री वेगळेच आदेश जारी करतात. तर आरोग्यमंत्र्यांची भूमिका वेगळीच असते. पुण्यातील व्यापाऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामान्यांना न्याय हवा आहे. महाविकास आघाडीने अंतर्गत वाद मिटवावेत आणि पुणेकरांना न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.
जर स्थानिक प्रशासनाला शहरात दुकानांच्या वेळा वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्याची गरज वाटत असेल तर, पुणे पालिकेने तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा. आम्ही त्यावर विचार करु असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.




