पुणे शहर

कर्वेनगरमध्ये पुणे महापालिका शाळेतील लसीकरण केंद्रात चोरी…

कर्वेनगर : pune city, karvenagr कर्वेनगर मधील महानगरपालिकेच्या नियोजित शाळेतील लसीकरण केंद्रात चोरीचा प्रकार घडला आहे.  लसीकरणाच्या कामासाठी देण्यात आलेला संगणक चोरट्यांनी खोलीचा दरवाजा उचकटून चोरून नेला आहे. Theft at Pune Municipal Corporation’s vaccination center in Karvenagar …

या संदर्भात समर्थ पवार यांनी फिर्याद  दिली असून वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या प्रकारात चोरट्यांनी कर्वेनगर मधील शाहू कॉलनी गल्ली क्रमांक १ येथील नियोजित महापालिका शाळेत आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरण सुरू केंद्र आहे. फिर्यादी समर्थ पवार हे येथे नोकरी करतात. २३ व २४ ऑगस्ट रोजी कोविडची लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद होते त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

लसीकरण केंद्र चालवण्यासाठी पुणे मनपा आरोग्य विभागाकडुन या केंद्रावर एक संगणक देण्यात आला होता. सदरचा संगणक हा नियोजित मनपा शाळा या इमारतीचे खालील बाजुस असणारे जीन्याचे रुममध्ये ठेवला असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने जीन्याचे रुमचे कडी-कोयंडा उचकटुन, त्यावाटे आत प्रवेश करून, रूम मधील कडी कोयडयाचा बॉक्स व संगणक असा एकुण ६०,०००/- रु किचा ऐवज चोरून नेला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक जे.एन.होळकर यांनी सांगितले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे चेहरे बदलणार का? या सोबतच कोथरुड मतदार संघातील विकास कामे व कोथरुड, कर्वेनगर मधील नागरी प्रश्नांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची exclusive मुलाखत

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये