पुणे शहर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कर्वेनगरमध्ये आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कर्वेनगरमध्ये आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप करण्यात आले.(Distribution of Ayushyaman Bharat Yojana card in Karvenagar)
या प्रसंगी कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी, स्वीकृत सदस्य बापूसाहेब मेंगडे, प्रभाग अध्यक्ष हेमंत बोरकर, बाळासाहेब टेमकर,महेश पवळे, विशाल रामदासी,सुभेदार काका,सागर शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक राजाभाऊ बराटे, विठ्ठल बराटे यांनी केले होते.




