कोथरुड

कोथरुडमध्ये मुलांनी बनवल्या लाडक्या बाप्पाच्या शाडूमातीच्या मूर्ती ; दीवा प्रतिष्ठानकडून शिबिराचे आयोजन..

कोथरुड : दीवा प्रतिष्ठान व स्ट्रोक्स् प्रतिष्ठान फाऊंडेशनच्या वतीने ७ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शाडूमातीचे गणपती बनविण्याच्या मोफत प्रशिक्षण शिबिरात मुला मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती तयार केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी पाहण्यासारखा होता. The idol of the beloved Bappa made by the children in Kothrud;  Camp organized by Diva Pratishthan.

७ सप्टेंबर पर्यंत केळेवाडीतील वसुधा फाऊंडेशन हॉल मध्ये हे शाडूमातीचे गणपती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी या शिबिराचे संयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी मुलांनी या शिबिरात आकर्षक गणपतीच्या मूर्ती बनवून दाखवल्या.

Img 20210904 wa0072

यावेळी चेतन पानसरे, स्नेहल कुलकर्णी-जोगळेकर, पुजा शिर्के, दिलीप कानडे, सुनिता खरात, सुनंदा घाग, नितिन निवंगुणे, बाळासाहेब पिसाळ, रोहिदास जोरी, आशिष शिंदे, लखन सौदागर, नलीनी नलावडे आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन मानकर म्हणाले की, लाडक्या बाप्पाची मूर्ती बनवताना मुलांमधील उत्साह पाहण्यासारखा आहे. मन तल्लीन करून मुले मूर्ती बनवत आहेत व मनासारखी आकर्षक मूर्ती तयार झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आयोजक म्हणून माझ्या मनाला समाधान देऊन जात आहे. 

Fb img 1630678566217 1
Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये