बावधनला उप डाकघर सुरू करण्यासाठी कुणाल वेडेपाटील यांच्याकडून पाठपुरावा…

बावधन : pune city, Bavdhan बावधन येथील नागरिकांना डाकच्या कामासाठी पाषाण सर्कल येथील गोल मार्केट येथे जावे लागत असल्याने लांबचा पल्ला गाठावा लागतो. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने बावधन मध्येच भारतीय डाक चे उप डाक घर सुरू करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष कुणाल वेडे पाटील यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
या संदर्भातील मागणीचे पत्र कुणाल वेडे पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले असून त्यांच्याकडूनही या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
वेडे पाटील यांनी सांगितले की,बावधन भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या भागातील नागरिकांना पोस्टाच्या कामासाठी पाषाण येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ ही जातो व येण्या जाण्याचा त्रास ही सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी बावधन (पिन कोड ४११०२१) येथे मध्ये भारतीय डाकचे उप डाकघर सुरू होणे अतिशय महत्त्वाचे असून ते सुरू झाल्यास नागरिकांचा मोठा त्रास कमी होणार आहे.




