कोथरुड

पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत विद्यार्थ्यांचे मास्क, सॅनिटायझर व चॉकलेट देऊन स्वागत..

विद्यार्थ्यांनी त्रिसूत्री चे पालन करावे – शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर

कोथरूड : pune city , Kothrud विद्यार्थ्यांनी त्रिसूत्री चे पालन केल्यास सर्वांचे आरोग्य उत्तम राहील आणि पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ येणार नाही असे मत शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्लिश मिडीयम शाळेत आज विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना हँडसफ्री सॅनिटायझर स्टँड व मास्क तसेच दीपकजी पोटे यांच्यातर्फे चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी स्वतः सोबत आपल्या कुटुंबीयांची देखील काळजी घेतली पाहिजे व घरातील सर्वांनीच लसीकरण करून घेतले आहे का, व दोन्ही डोस घेतले आहेत का याची विचारणा केली पाहिजे असेही सौ. खर्डेकर म्हणाल्या.
कोणास ताप, सर्दी पडसे, डोकेदुखी, तोंडाची चव जाणे, वास न येणे असे झाल्यास त्वरित डॉक्टर कडे जाणे व शाळेत न येणे हे पाळले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.  केले.

आज तब्ब्ल 80% उपस्थिती लावून विद्यार्थ्यांनी शाळा सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला. नगरसेवक व भाजप चे शहर सरचिटणीस दीपक पोटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “तुम्हाला ऑफलाईन शाळा आवडते की ऑनलाईन, यावर विद्यार्थ्यांनी एकमुखाने ऑफलाईन असे उत्तर दिले ” यावेळी दीपक पोटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना कॅडबरी चॉकलेट चे वाटप करून त्यांचे स्वागत केले.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी मुलांकडून कवितेच्या रूपात समूहगीत गाउन घेतले व त्यांचा उत्साह वाढविला.कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानताना त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने राबविलेल्या लसीकरण मोहीमे मुळे  आपण सुरक्षित वातावरणात असून त्यांच्यामुळेच आता शाळा सुरु होत असून एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात रुग्णसंख्या आटोक्यात राहिली असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी यावेळी फलकावर आम्ही त्रिसूत्री चे पालन करू, मास्क चा वापर करू, हात सातत्याने धुवून सॅनिटाईझ करू व सुरक्षित अंतर पाळू असे लिहून अभ्यासाला प्रारंभ केला. आय टीच संस्थेचे गीतेश शिनगारे यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,सरचिटणीस अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, प्राची बगाटे, माणिकताई दीक्षित, किरण देखणे, युवा मोर्चा सरचिटणीस दीपक पवार, उपाध्यक्ष प्रतीक खर्डेकर, मंगलताई शिंदे उपस्थित होते. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन व प्रास्ताविक केले, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये