कोथरूड मधील नागरिकांना सर्व प्रकारच्या लॅब टेस्ट साठी ३०% सवलत कार्डचे वाटपाचा अभिनव उपक्रम

भाजपचे अजित जगताप आणि सुजाता जगताप यांचा अभिनव उपक्रम
पुणे : कोविड १९ या महाभयंकर महामारीने उदभवलेल्या परिस्थितीमुळे व अपरिहार्य लॉकडॅाऊन मुळे अनेकांचे रोजगार व नोकर्या गेले आहेत. लॅब चाचण्या व वैद्यकीय उपचार करणे अनेकांसाठी जिकिरीचे झाले आहे. कोणत्याही आजाराचे निदान करण्यासाठी लॅब चाचणी ही महत्वाचीच त्यामुळे जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधुन भाजपचे अजित जगताप आणि सुजाता जगताप यांनी कोथरूड मधील सर्व नागरिकांना सर्व प्रकारच्या लॅब टेस्ट साठी ३०% सवलत कार्डचे वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या कार्डचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकांची गरज ओळखुन चांगला उपक्रम केला असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले अधिकाधिक लोंकापर्यंत कार्ड पोहचले पाहिजे असे पाटील यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. कोथरूड मधील ॲपेक्स लॅब (Apex Pathology Laboratory) मध्ये होणार्या सर्व प्रकारच्या चाचण्या हे कार्ड धारकांना ३०% सवलतीच्या दरात उपलब्ध असतील असे या उपक्रमाचे आयोजक अजित जगताप यांनी सांगितले तसेच ९८९०५८७६७६ या नंबर फोन केल्यावर घरपोच कार्ड उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग कसा जोडला जाईल? आणि कसा तोडला जाईल? जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

यावेळी या उपक्रमाचे आयोजक सुजाता जगताप, अक्षय शेलार, अनिकेत शेलार, यशवंतराव बुचके, आप्पा बांदल, अरूण गुजर, महेश केळकर, नाना नागवडे व इतर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.



