महाराष्ट्र

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा परशुराम सेवा संघाची राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेना निवेदन देऊन मागणी

पुणे : महाराष्ट्रात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येऊन महामंडळास किमान रुपये 1000 कोटी चा निधी देऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन देऊन परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे व समस्त ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे नेते प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे

महाराष्ट्र राज्यात ब्राह्मण समाजाची अत्यंत दयनीय अवस्था असून ग्रामीण भागात राहणाऱ्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या सुविधा सवलती उपलब्ध नाहीत कूळ कायद्यात शेती गेल्यामुळे उपजीविकेचे कोणतेही शाश्वत साधन उपलब्ध नाही. त्यामुळे गेली पंधरा वर्षे ब्राह्मण समाजातून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात मागणी प्रलंबित आहे.आपल्या शेजारील तेलंगणा कर्नाटक तसेच उत्तराखंड इत्यादी राज्यांनी ब्राह्मण समाजासाठी विविध प्रकारच्या योजना तथा बोर्ड निर्माण केले आहेत. याद्वारे ब्राह्मण समाजातील तरुणांसाठी व्यवसाय उभारणी तांत्रिक प्रशिक्षण यासोबतच ज्येष्ठांसाठी वैद्यकीय मदत अशा प्रकारच्या उत्तम योजना चालवल्या जातात.

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग कसा जोडला जाईल? कसा तोडला जाईल ? जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://fb.watch/8sSWWrlhK5/

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

महा विकास आघाडी सरकारने एका मंत्रिमंडळ बैठकीत अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गासाठी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कानावर आले अशाप्रकारे अमृत स्थापन केल्याने ब्राह्मण समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत यामध्ये अनेक जाती असल्यामुळे अमृत द्वारे आम्हाला न्याय मिळेल असे वाटत नाही देशातील इतर राज्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र योजना करत आहेत तशीच योजना महाराष्ट्रात देखील होणे गरजेच आहे.अशीमागणी निवेदनात करण्यात आली आहे.


                                                 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये