पुणे शहर

महापौर मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एकमेकांना भरवला लाडू..

परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे – अंकुश काकडे , संदीप खर्डेकर.

पुणे : pune city काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे महापौर मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत एकमेकांना मिठाई भरवत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कटुता विसरत पुण्याची राजकीय स्नेहाची परंपरा जपली.

पुणे हे विद्येचे माहेरघर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या उज्ज्वल परंपरा असलेल्या शहरात गेले काही दिवस पुणे मनपा सभागृह आणि सभागृहाबाहेर ही मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटत होते. अश्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याची राजकीय संस्कृती जपण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचे ठरविले आणि त्यानुसार आज फर्ग्यूसन रस्त्यावरील वाडेश्वर कट्टा येथे महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस चे गटनेते आबा बागुल, मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह डॉ.सतीश देसाई,श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल  व इतर मान्यवर उपस्थित होते.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

पुण्याची संस्कृती ही मतभेद झाले तरी मनभेद होऊ नयेत अशी आहे, मात्र गेले काही दिवस मनपातील विषयांच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असून त्यातून वैयक्तिक कटुता येऊ नये यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यावेळी सांगितले.

Img 20211028 wa0192 1

पुणे शहराला एक वैभवशाली राजकीय परंपरा आहे, येथे राजकीय आरोप करत असताना वैयक्तिक चिखलफेक होऊ नये व एकमेकांच्या कुटुंबियांवर, शारीरिक व्यंगावर टीका टिप्पणी केली जाऊ नये असे वाटते म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर सांगितले.

Img 20211028 wa0242

माननीय महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशांत जगताप यांनी एकमेकांना तर आबा बागुल व गणेश बिडकर यांनी देखील एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड केले व दिवाळी शुभेच्छा दिल्या. तसेच भावी काळात असे प्रसंग उद्भवू नयेत याची काळजी घेऊ अशी ग्वाही ही सर्वांनीच दिली. हे आमच्या प्रयत्नांचे यश असून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या समंजसपणाने पुणेकरांची दिवाळी अधिक गोड झाली असल्याची भावना स्नेहमिलन दिवाळी फराळाचे संयोजक
अंकुश काकडे व संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केल्या.

Img 20211028 wa0117
Img 20211028 wa0118
Img 20211102 wa0362
Img 20211101 wa0232
Img 20211027 wa0188
Img 20211029 wa0160
Img 20211027 wa0185
Img 20211027 wa0183
Screenshot 2021 11 01 12 38 13 32
Img 20211028 wa0241
Img 20211102 wa0037
Img 20211102 wa0015
Img 20211102 wa0361
Img 20211102 wa0016
Img 20211102 wa0370
Img 20211102 wa0371

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये