पुणे शहर
नगरसेवक किरण दगडे पाटील पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदी बहुमतांनी विजयी

पुणे : पुणे महानगर नियोजन समिती (PMRDA) सदस्यपदी नगरसेवक किरण दगडे पाटील बहुमतांनी विजयी झाले आहेत. पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.
किरण दगडे पाटील म्हणाले, मला मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून नागरिकांच्या दृष्टीने गरजेच्या असलेली कामे या पदाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच पक्ष नेतृत्वाने मला संधी दिल्याने त्यांचेही मी आभार मानतो.







