एम.आय.टी.टेकडी परिसरात स्वच्छता अभियान

पुणे महापालिका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संयुक्त उपक्रम
पुणे : एमआयटी टेकडी पासून सिग्मा सोसायटी पर्यंत टेकडीवर जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने अनेक ज्येष्ठ नागरिक,तरुण-तरुणी टेकडीवर फिरायला आणि व्यायामाला येत असतात. परंतु अनेक दिवसापासून या रस्त्यावर सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. त्यामुळे टेकडी प्रेमी नागरिकांना या रस्त्याने जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने तेथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आज त्या रस्त्यावर कुठेही घाण दिसून येत नाही त्यामुळे टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमाचं आयोजन मनसेचे उपविभाग अध्यक्ष गणेश शिंदे यांनी केले होते. या स्वच्छता मोहिमेमध्ये राज सोसायटीतील असंख्य बाळगोपाळ सहभागी झाले होते. त्याच बरोबर मनसेचे बाळासाहेब शिंदे,सचिन चव्हाण, निखिल काळे,श्रीकांत जाधव,अमर कांबळे,अक्षय नगरकर,तसेच सई, सार्थक,शौर्य,शिवराज,वेदांत, इतर व संतोष ताटकर साहेब, मोकाशी साहेब,गजानन कांबळे साहेब महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थीत होते.




