‘थर्टी फर्स्ट’ला शिर्डीतील साईबाबा मंदिर बंद राहणार..

पुणे : शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर 31 डिसेंबरला बंद राहणार आहे. नव्या वर्षात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साईसंस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
एक जानेवारीला सकाळी सहा वाजता शिर्डीचे साई मंदिर उघडणार आहे. दरवर्षी 31 डिसेंबरच्या भक्तांच्या सोयीसाठी रात्रभर साईमंदिर खुले ठेवले जाते. यावर्षी मात्र निर्बंधामुळे साईमंदिर राहणार बंद राहणार आहे. साईमंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून निर्णय जाहीर केला आहे.
तसेच पहाटेची काकड आरती व शेजारतीमध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाही. साईबाबा मंदिरातील लाडू केंद्र, प्रसादालयदेखील बंद ठेवले जाणार आहे. संचारबंदीमुळे मंदिराच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच कॅन्टनची सुविधाही भाविकांसाठी बंद राहणार आहे.
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, प्रसादालयात एकाच वेळी एक हजारांहून अधिक भाविक प्रसाद भोजन करतात. मात्र, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई आहे.





One Comment