कालीचरण महाराज यांना अखेर अटक

रायपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराज यांना अखेर अटक करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. कालीचरण महाराजांविरोधात तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कालीचरण महाराजांना मध्यप्रदेशमधील खजुराहोमधून ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल धर्मसंसदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक करण्यात आलंय. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून याबाबत तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यप्रदेशमधील खजुराहो येथून महाराजांना अटक करण्यात आले आहे.

कालीचरण महाराज महाराष्ट्रातील अकोला येथील असल्याचे समजते. त्यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कालीचरण महाराजांनी गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजांनी हे तारे तोडले होते.



