राष्ट्रीय

5.89 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल

नवी दिल्ली : आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 31 डिसेंबरपर्यंत जवळपास 5.89 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

31 डिसेंबर रोजी 46.11 लाखाहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली. पोर्टलवर सुरळीत अनुभवासह करदात्यांना मदत करण्यासाठी, मदत कक्षाद्वारे 16,850 करदात्यांच्या कॉल्स आणि 1,467 चॅट्‌सना प्रतिसाद देण्यात आला. याव्यतिरिक्त, विभाग सक्रियपणे त्याच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवर मदतीसाठी करदाते आणि व्यावसायिकांशी संपर्क साधत आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. 31 डिसेंबर 2021 या एका दिवसात, करदाते आणि व्यावसायिकांच्या 230 हून अधिक ट्‌विटला प्रतिसाद देण्यात आला.

45.7% पेक्षा जास्त आय टी आर पोर्टलवर ऑनलाइन खढठ फॉर्म वापरून दाखल केले गेले आहेत आणि उर्वरित ऑफलाइन सॉफ्टवेअर युटिलिटीजमधून वापरून अपलोड केले गेले आहेत.सर्वांना सुरळीत आणि स्थिर करदाता सेवेचा अनुभव सुनिश्‍चित करण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करण्याच्या आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो असे म्हणत विभागाने करदाते, कर सल्लागार, कर व्यावसायिक आणि इतर ज्यांनी हे शक्‍य केले त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये