महाराष्ट्र

पुणे – मुंबई धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस रद्द

पुणे : ठाणे ते दिवा मार्गावर नव्याने टाकण्यात आलेल्या मार्गिकांच्या कामांसाठी पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे काही गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावणार असून, त्यात मुंबई- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसचा समावेश आहे.

दादर-हुबळी एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुण्यातून सोडण्यात येणार आहे. हुबळी-दादर एक्स्प्रेस 7 आणि 8 जानेवारी 2022 ला मुंबईत न जाता पुण्यापर्यंतच धावणार आहे. मुंबई कोल्हापूर एक्स्प्रेस पुणे येथून 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी सोडण्यात येणार आहे. कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस 8 आणि 9 जानेवारीला पुण्यापर्यंत धावणार आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Img 20220107 wa0274
Img 20220105 wa00031311456043270984558

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये