पुणे शहर

लसीकरण केंद्रावरील गोंधळ रोखण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करा : पृथ्वीराज सुतार

शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा…

पुणे : शहरातील अनेक लसीकरण केंद्रावर अद्यापही आवश्यक ते डॉक्टर नर्स, ऑपरेटर व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे लासीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती होत आहे. त्यामुळे सर्व लसीकर केंद्रावर डॉक्टर, नर्स, ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणुक करावी अशी मागणी शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन सुतार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साधारण रोजची पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या चार हजारावर गेलेली आहे. त्यामुळे कोरोनाची तीसरी लाट जर थोपवायची असेल तर जास्त लसीकरण केंद्र सुरू करून आवश्यक तो स्टाफ त्याठिकाणी नेमणे गरजेचे असल्याचे सुतार यांनी म्हंटले आहे.

आता १३ वर्ष ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना पहिला डोस तसेच फ्रंट लाईन वर्कर्स व  ६० वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देणेबाबत परवानगी देण्यात आली आहे. मनपाने सुद्धा अनेक लसीकरण केंद्रांवर ही सुविधा सुरु केली आहे. सध्या या केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी होत आहे, पण केंद्रावर आवश्यक ते डॉक्टर नर्स, ऑपरेटर व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ उडत आहे. अनेक ठिकाणी वाद होत असून गर्दीला नियंत्रण करणे आवाघड होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर आवश्यक ते डॉक्टर, नर्स, ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची किमान सहा महिन्यांसाठी त्वरीन नेमणूक करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा “शिवसेनेचे  आंदोलन करण्यात येईल असा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Img 20220108 wa0160
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये