पुणे शहर
पुणे स्थानकात मेमूचा डबा रुळावरून घसरला

पुणे : पुणे स्थानकात मेमूचा डबा घसरल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाडयांवर त्याचा परिणाम झाला आहे.
यार्डातून स्थानकात गाडी येत असताना सकाळी पावणेदहा वाजता ही घटना घडली. ही मेमू लोकल पुणे – दौंड दरम्यान धावते. ही रेल्वे स्थानकावर शंटींग (रेल्वे रुळ बदलने) करताना हा अपघात घडला. त्यामुळे पुणे – दौड जाणारी सकाळची मेमू रद्द करावी लागली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुणे – दौंड दरम्यान धावणारी ही रेल्वे ट्रेन यार्डात जाताना हा अपघात घडला. शंटींग करताना यात प्रवासी नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.




