पुणे शहर

फरासखाना पोलिस स्टेशनला कम्प्युटर व प्रिंन्टर भेट ; फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटी व देशप्रेमी मित्र मंडळाचा उपक्रम..

पुणे : फरासखाना पोलिस स्टेशनला फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटी व देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने कम्प्युटर व प्रिंन्टर भेट देण्यात आला. या वस्तू संस्थेच्या वतीने मंदार बलकवडे व पियुष कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनकडे सुपूर्द केल्या.

दोन दिवसांपूर्वी महापारेषणच्या ४०० केव्ही टॅावर लाईन मध्ये अचानक बिघाड झाल्याने शहरात पहाटेच्यावेळी सर्वत्रच लाईट गेल्यामुळे पोलिस स्टेशनचे अनेक कम्प्युटर बंद पडले. ही बाब पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र लांडगे यांचे सहकारी गणेश दळवी यांनी लक्षात आणून दिल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटी व देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने ही भेट देण्यात आली.

संस्थेच्या वतीने कम्प्युटर व प्रिंन्टर फरासखाना पोलिस स्टेशनकडे सुपूर्द केला गेला. यावेळी पोलिस निरिक्षक राजेंद्र लांडगे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुशिल बोबडे, सतिश दिघे, रूपेश आटक, मंगेश मते, मंदार महाडीक समिर बलकवडे आदी उपस्थित होते.

Img 20220118 wa0213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये