सांस्कृतिक

प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली ही विनंती

पुणे : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकविनंती केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

प्राजक्ता माळीने काय म्हटलंय?

“नमस्कार, नुकतंच आमच्या पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. १८ फेब्रुवारीला पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याही चित्रपटावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. पण आता सरकारलाच विनंती आहे की, करोनाचा जोर ओसरला आहे. सर्वच नियम बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच ५० टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असे का?”

“त्यामुळे आम्हा सर्वांची अशी नम्र विनंती आहे की शिवजयंती तोंडावर आहे. त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, चित्रपट निर्मात्यांना, सर्व रंगकर्मींना १०० टक्के आसनक्षमतेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली आहेत, ही आनंदाची बातमी द्याल. आम्ही आशा करतोय की १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु व्हावीत. त्याचा आम्हा सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना खरच खूप फायदा होईल. ही सरकारला नम्र विनंती. त्यासोबत प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, ही विनंती.”

या व्हिडीओद्वारे तिने महाराष्ट्र सरकारला चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करा, यासाठी कळकळीची विनंती केल्याचे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये