आंतरराष्ट्रीय
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची रोमानिया, हंगेरी मार्गे होणार सुटका

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार चार विमानं पाठवणार आहे. विमानांच्या सुरक्षेची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी हमी दिली आहे. चारपैकी तीन विमाने रोमानियामध्ये उतरतील तर एक विमान हंगेरीमध्ये उतरणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताने पाठवलेले विमानाच्या सुरक्षेची हमी दिली आहे. अडकलेल्या भारतीयांना रस्त्याने या दोन्ही देशांमध्ये नेण्यात येणार आहे. त्यानंतर विमानाने भारतामध्ये आणलं जाणार आहे. रोमानियामधून उडणारे विमान मुंबईमध्ये उतरणार आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनच्या परिस्थितीवर आणि अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.







