
पुणे : राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर यांनी स्त्रीशक्तीची परिभाषा अपणा सर्वांना अवगत करून दिली. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेऊन आजची नारी प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचे स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. यात “ती” चा सन्मान आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आला.
महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या महिला सफाई योद्ध्यांची कामगिरी जेवढी उल्लेखनीय आहे तेवढाच त्यांचा प्रवास ही खडतर. जागतिक महिला दिनानिमित्त या स्त्रीशक्तीला प्रणाम या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी केले.अशा प्रकारच्या सन्मानाने महिला सफाई कामगार यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे असे गुरनानी म्हणाले.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अमोल गायकवाड ,ऋषिकेश शिंदे,मंगेश भोंडवे,आरव दिघे. दिघे,तेजस बनकर,मिलिंद शिंदे,गोविंद अष्टेकर,पृथ्वी दहीवाल,कमलेश फाले,राजू अल्हाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




