पुणे शहर

अमोल बालवडकर यांचा संवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद..

सुस : संवादयात्रेच्या माध्यमातून सुस येथील लाईफ मॅांन्टेज (Life Montage) सोसायटी तसेच परिसरातील नागरीकांना प्रत्यक्ष भेटून अमोल बालवडकर यांनी संवाद साधला. यावेळी सुस-म्हाळुंगे ही गावे नव्याने महानगरपालिका हद्दित समाविष्ठ झाल्यानंतर येथील रहिवाश्यांना पाणी, ड्रेनेज, रस्ते, पथदिवे यासारख्या मुलभुत सोयी-सुविधा पुरवण्यास लोकप्रतिनिधी म्हणुन आम्ही कटिबद्ध आहोत व लवकरच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन या दोन्ही गावांचा बाणेर-बालेवाडी प्रमाणे नियोजनबद्ध विकास केला जाईल असे बालवडकर यांनी उपस्थित नागरिकांना आश्वसित केले.

यावेळी सोसायटी परिसरातील अवैध देशी दारु विक्री संबंधी नागरीकांनी बालवडकर यांच्याकडे तक्रार केली होती यावर तातडीने संबंधित पोलिस यंत्रणेशी संपर्क साधुन हि दारु विक्री थांबवल्याबद्दल सर्व सभासदांनी विशेषतः महिलांनी अमोल बालवडकर यांचे आभार मानले.

या संवाद यात्रे दरम्यान तयार केलेले कॅाफी टेबल बुक सभासदांना भेट देवुन पाच वर्षात नगरसेवक म्हणून केलेल्या विकास कामाची माहिती बालवडकर यांनी नागरिकांना दिली. प्रभागातील २४x७ पाणी प्रकल्प, स्मार्ट स्ट्रिट, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प, पाषाण-सुसखिंड पुल, प्लेस मेकिंग, आर.के.लक्ष्मण आर्ट गॅलरी, उद्याने, क्रिडांगण याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी परिसरातील नागरीकांनी मुख्य रस्त्यावर गतिरोधक करावेत, नियमित पाणी पुरवठा, एस.टी.पी.प्लांन्ट, ड्रेनेज, घनकचरा अशा काही समस्या मांडल्या व सुचना देखिल केल्या आगामी काळात या सुचना लक्षात घेवुन सर्व समस्या सोडवण्याचे अमोल बालवडकर यांनी त्यांना आश्वासन दिले. यावेळी अनिल ससार व सोसायटीतील सभासद उपस्थित होते.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये