पुणे शहर

सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुक्ता साळवे यांच्या नावाने होणाऱ्या वसतिगृहाची मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने केली पाहणी..

शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांची घेतली भेट


पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये शिकणारी भारत देशातील पहिली विद्यार्थिनी सत्य शोधक मुक्ता साळवे यांच्या नावाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्या मुलींच्या वसतीगृहाच्या कामाची पाहणी तसेच उद्घाटन सभारंभ सोहळा व पुतळा बसवण्याच्या संदर्भात आज मातंग समाजाच्या शिष्ट मंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांची भेट घेतली.

या शिष्टमंडळा मध्ये महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिगुरु लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती लोखंडे क्रांतिगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक लोखंडे, मातंग समाजाचे ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक भास्कर नेटके व सामाजिक कार्यकर्त्या* उषाताई नेटके, लोकशासन आंदोलन पार्टीचे पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पाटोळे, डॉ. नारायण डोलारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अपंग सेलचे पुणे शहर संघटक  अमित शिंदे, युवा नेते सचिन डाकले  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीत कुलगुरुंनी स्वतः वसतीगृहाच्या सर्व कामाची माहीती दिली व लवकरच या वसतिगृहाचे उद्घाटन करू असे आश्वासन दिले. सत्यशोधक मुक्ता साळवे यांचा पुतळा विद्यापीठात बसवण्याच्या अनुषंगाने आज पर्यंत झालेल्या सर्व कामाची माहिती कुलगुरूंनी दिली व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना शिष्टमंडळासोबत वसतिगृहाच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले. या भेटीचे नीयोजन साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद राम शिंदे यांनी केले होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये