पुणे शहराच्या दृष्टीने मोठी सकारात्मक बातमी अनेक दिवसानंतर नवीन कोरोना रूग्ण संख्येत मोठी घट…

पुणे : पुणे शहरात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे.यातच आज सोमवारी पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसानंतर नव्याने तीन आकडी रुग्ण संख्या नोंद झाली आहे. त्यामूळे पुणेकरांना मोठा दिलासा देणारी हि आकडेवारी आहे.(Big positive news for Pune city After many days, the number of new corona patients has come down drastically)
गेल्या एक मार्चपासून पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक नोंदवला जात होता.मात्र कडक लॉकडाऊन नंतर शहरातील रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली. दोन महिन्यानंतर या रुग्ण संख्येत लक्षणीय घट होण्यास सुरूवात झाली.
आजचे (दि.१७ मे) पुणे शहरातील कोरोनाचे अपडेट
– दिवसभरात ६८४ नवीन रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २७९० रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील.
– १४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५९९८७.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८४४०.
– एकूण मृत्यू -७७४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४३३७९८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८६२.

तर आज सोमवारी (दि.१७) रोजी नवीन रुग्ण संख्येत घट होऊन एक हजाराच्या खाली नविन रुग्ण संख्येची नोंद झाली.यामुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंताजनकच आहे.



मुळशीत रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ११ वर्षीय मुलाचे ससूनमधील डॉक्टरांनी वाचविले प्राण ; दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी






