चांदणी चौकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मैत्री व्यासपीठकडून चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

पुणे : कोथरूड भागातील सर्व पक्षीय राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मैत्री व्यासपीठचा स्नेहमेळावा कोथरूड येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व सभासदांना मार्गदर्शन केले.
यावेळी पौड रस्त्यावरील चांदणी चौकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे असे निवेदन मैत्री व्यासपीठाच्या वतीने पाटील यांना देण्यात आले. याबद्दल पाटील यांनी सकारात्मक विचार करू असे सांगितले.त्याबद्दल त्यांचे मैत्री व्यासपीठाच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले.
मैत्री व्यासपीठाचे सदस्य नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ते
प्रशांत हरसुले, नवनाथ जाधव, गणेश वर्पे,कुलदीप सावळेकर, गिरीश भेलके, डॉ संदीप बुटाला, किशोर सोनार,यांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. या स्नेहमेळाव्याचे यजमान संदीप मोरे यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
















