कोथरुड

कोथरूडमध्ये टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या विविध कलाकृतींचे अनोखे प्रदर्शन.. 

कोथरूड बावधन क्षत्रिय कार्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम.                       

कोथरुड : pune city, kothrud डहाणूकर कॉलनीतील श्री सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात टाकाऊ वस्तु पासून बनवण्यात आलेल्या टिकाऊ व नाविन्यपूर्ण कलावस्तुंचे  प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटन कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र संचलित श्री सरस्वती शाळेचे पदाधिकारी धर्माधिकारी व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे  उपस्थित होते. श्री सरस्वती विद्या मंदिर प्रशालेचे २०, वनाज परिवार शाळेचे १०, शिवराय प्रतिष्ठान शाळेचे १० असे एकूण चाळीस विद्यार्थी व विद्यार्थिनी या प्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकाऊ कागद, प्लास्टिक, रद्दी पेपर, पुट्टा, जुने कापड, लाकूड अशा विविध टाकाऊ कचऱ्यापासून अनेक शोभेच्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार करून प्रदर्शनात मांडल्या होत्या.

का आली बंगला पाडण्यासाठी पुणे महापालिकेची खोटी नोटीस.. खालील लिंकवर क्लिक करा.

https://fb.watch/8nTtDp6sKX/

या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना कचरा स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. कचरा टाकाऊ नसून तो एक उपयुक्त व शोभेच्या वस्तू तयार करण्याचे साधन आहे म्हणून नागरिकांनी कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, त्यामुळे कचऱ्यापासून विविध वस्तू तयार करून बाजारामध्ये विकल्या तर गरजू महिलांना रोजगार मिळेल व कुटुंबाचा चरितार्थ चालेल. तसेच कचऱ्यापासून विविध वस्तू तयार केल्यानंतर कचऱ्याचे प्रमाण कमी होईल व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. असा संदेश यावेळी देण्यात आला.

हर्षदीप फाउंडेशन महिला बचत गटाच्या माध्यमातून व जनवाणी सहकारी संस्थेच्या सदस्यांनी जुन्या कपड्या पासून महिलांनी बनवलेली नाविन्यपूर्ण पाकिटे, बटवे, पिशव्या शिवाय कागदापासून शोभेच्या फुलांच्या कंरड्या, फुलदाणी इत्यादी वस्तू तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर नाविन्यपूर्ण वस्तू बनवणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय महानगरपालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ व व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, मुकादम वैजनाथ गायकवाड, अण्णा ढावरे तसेच श्री सरस्वती विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापिका रेखा जगदाळे  व कैलास सरतापे, उज्वला ढेरे, अमृत यादवाड, अर्चना शेडगे यांनी केले होते. सदर प्रदर्शनात हर्षदीप फाउंडेशनच्या ज्योती बेंडाळे, जनवाणीचे समीर अजगेकर, जयश्री पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

इलेक्ट्रिक वाहने सुरक्षित आहेत का? पहा व्हिडिओ

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये