महाराष्ट्रराजकीय

अजित पवार नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांच्या भेटीला,
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा शरद पवारांना प्रस्ताव, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठ्या उलथापालथी?

राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचा विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतंही भाष्य केलं नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीविषयी माहिती दिली. सुमारे तासभर चर्चा या भेटीत झाले.

Img 20221228 wa00016208176808646242256

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली. शरद पवार हे बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असल्याचं समजलं. त्यामुळे वेळ न मागता आम्ही इथे आलो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचाही विचार करुन त्यांनी येत्या काही दिवसात मार्गदर्शन करावा अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं.”

Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये