महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द ; पोलीस जबाब नोंदवण्यासाठी बंगल्यावर जाणार

मुंबई : सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर वरून दिली आहे.


भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. रश्मी शुक्ला यांचे विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागर या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये