महाराष्ट्र

Municipal Corporation Election : या महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना बृहन्मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Carporation) प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतू राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये