पुणे शहर

कोरोना रुग्ण वाढत असताना पालिकेच्या सुविधा नसल्याने नागरिकांची हेळसांड, सी सी सी सेंटर सुरू करण्याची धुमाळ यांची मागणी

पुणे : कोरोना या संसर्गजन्य रोगाची पुन्हा लाट आली आहे. पुणे शहरात कोरोना बाधीत रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून दैनंदिन ३००० हून जास्त रुग्ण आढळून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी पुणे शहरात ३००० हून जास्त रुग्ण आढळून येत होते तेव्हा पुणे महापालिकेची असलेली सीसीसी (कोविड केअर सेंटर) व इतर सुविधा या सद्यस्थितीत नसल्याने नागरिकांची पुन्हा हेळसांड होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा सीसीसी सेंटर्स  सुरू करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. As the number of corona patients is increasing, the municipality should start a CCC center

कोरोनाचे दैनंदिन ३००० हून वाढते रुग्ण पाहता पुणे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पुणे शहरात मध्यमवर्गीय व गोरगरीब  नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून काही ठिकाणी एका कुटुंबात कमीत कमी ६  व जास्तीत जास्त १० नागरिक राहतात, बहुतांशी कुटुंबात वयोवृद्ध नागरिक असतात. घरातील एक जरी व्यक्ती कोरोना बाधित झाली तरी वयोवृध्द नागरिकांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते.

Img 20210319 wa0097

सध्या महानगरपालिकेच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णाला होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. परंतु एका घरात साधारण ५-६ जण राहत असल्या कारणाने कोरोना बाधीत रुग्णाला होम आयसोलेशन करणे सर्वांनाच शक्य होत नाही. यासाठी सीसीसी सेंटर पूर्वीप्रमाणे महानगरपालिकेने पुणे शहरात क्षेत्रीय कार्यालय निहाय सुरु करणे गरजेचे असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

याबाबत प्रशासनाने सकारात्मक विचार  करावा व  खाजगी दवाखान्यामध्ये अनेक नागरिकांना बेड्स उपलब्ध होत नाही यासाठी व्यवस्था करावी. याविषयी तातडीने सर्व पक्षनेत्यांची तातडीने बैठक बोलविण्यात यावी. अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Img 20210313 wa0015

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये