महाराष्ट्र

पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार! कोकण, विदर्भात पावसाची शक्यता

पुणे :  पुणे, मुंबईसह राज्यात पुढील 5-6 दिवसांत कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंड वाढेल. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहणार असून कोकण, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदललं होतं. मात्र, आता राज्याच्या काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात आजही ढगाळ वातावरण राहणार आहे. बदलत्या वातावरणातील स्थितीमुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Img 20231109 wa0012281291226259195260975368

मुंबईत 14 डिसेंबरनंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मुंबईतचं हवामान उत्तरेकडील वाऱ्यांवर अवलंबून असेल. सध्या तापमानात केवळ एक ते दोन अंशांची घट होऊ शकते. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा मुंबईच्या हवामानावर जास्त परिणाम होणार नाही. देशाच्या उत्तरेकडील भागात जोरदार पाऊस झाल्याशिवाय पारा मुंबईत फारसा घसरण्याची शक्यता नाही. दरम्यान, 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी वाढेल.

Img 20230717 wa0012281294586790481769091554

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक पावसाची  शक्यता आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडील  राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा प्रभाव राज्याच्या  हवामानावरही दिसून येत आहे. राज्यात कोकण  आणि विदर्भात  तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.

Img 20230511 wa0002282292722773256594657904
Img 20231109 wa00107449750233581593236
Img 20230812 wa0001281295283768095978676207
Img 20221228 wa000128229779882107384657043

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये