पुणे शहर

रोजगार मिळाल्यानंतर तरूणांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देतो – दीपक मानकर

पुणे : नोकरी मिळाल्याचा आनंद तरूणांच्या चेहऱ्यावर पाहिल्यावर खऱ्या अर्थाने वाढदिवस सार्थकी झाला असे वाटते व मनाला समाधान मिळते, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी व्यक्त केल्या.

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सनी मानकर आणि कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवाचे उद्‌घाटन दीपक मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार ॲड. वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा ,युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानकर म्हणाले, तरुणांना रोजगार मिळणे हे आनंददायी बाब आहे आणि हा आनंद सनी आणि गिरीश यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून दिला आहे. तरुणांच्या हाती रोजगार देण्यासाठी अशा स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी अनुकरण करणे गरजेचे आहे. या महोत्सवात तरुणांना नोकरी मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे.

ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, केंद्र सरकार रोजगार घालवत आहे तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.

सनी आणि गिरीश हे नेहमी समाजाला उपयोगी असे उपक्रम घेत असतात, सध्या रोजगार महोत्सव ही गरज असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

या महोत्सवात 540 तरूणांनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. त्यातील 95 तरूणांना तात्काळ नोकरीची संधी मिळाली, तर अन्य तरूणांचे दुसऱ्या फेरीत नोकरी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांनी दिली.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये