पुणे शहर

दीपक मानकर यांचा वाढदिवस आणि चर्चा पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची

दीपक मानकर यांना उमेदवारीसाठी वाढता पाठिंबा

पुणे: आगामी पुणे लोकसभा पोटनिवडणूकीत कसबा निवडणूकीची पुनरावृत्ती करून चमत्कार घडविण्याची ताकद दीपक मानकर यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याची चर्चा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली.निमित्त होते. दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मानकर यांनाच पुणे लोकसभेची उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मानकर यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते, साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या काना कोपऱ्यातून मानकर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून इतिहास रचल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. खासदार गिरीश बापट यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोट निवडणूकीत जिंकण्यासाठी तगडा उमेदवार म्हणून दीपक मानकर यांना संधी मिळाली पाहिजे. अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मानकर यांचे शहरातील सर्वच पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शहरातील सर्व भागात त्यांचा अफाट जनसंपर्क आहे. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ मानकर पुण्यातील राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी उपमहापौर, शिक्षण मंडळ अध्यक्ष, नगरसेवक अशा विविध पदांवर काम केले आहे. काँगेस पक्षा मधून राष्ट्रवादी पक्षामध्ये आल्यानंतर हि काँगेस पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यांचा लोकसभा पोट निवडणुकीत दीपक मानकर यांना उमेदवारीची संधी मिळाली पाहिजे असा आग्रह असल्याचे चित्र या कार्यक्रमात दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये