अर्थजगत

एप्रिल महिन्यात १५ दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या संपूर्ण यादी

पुणे : बँकिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार, एप्रिलमध्ये १५ दिवस बँका बंद राहतील, त्यात प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे राहिले असेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण एप्रिलमध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत.

एप्रिलमधील बँका महावीर जयंती, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, संक्रांती/बिजू महोत्सव/बिसू उत्सव, तामिळ नववर्ष दिन, विशू/बोहाग बिहू, बंगाली नववर्ष दिन (नबबरशा), शब-एल- कद्र ईद-उल-फित (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमात-उल-विदा आणि रमजान ईद (ईद-उल-फितर) या दिवशी बंद राहतील.

४ एप्रिल (मंगळवार) – महावीर जयंतीनिमित्त गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, राजस्थान, लखनऊ, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

५ एप्रिल (बुधवार) – बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहणार आहेत.

७ एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडेनिमित्त त्रिपुरा, गुजरात, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, श्रीनगर वगळता बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.

१४ एप्रिल (शुक्रवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/बोहाग बिहू/चिरावबा/वैसाखी/बैसाखी/तामिळ नववर्ष दिन/महाविसुभा संक्रांती/बिजू महोत्सव/बिसू उत्सव या दिवशी बँका बंद राहतील.

१५ एप्रिल (शनिवार) – त्रिपुरा, आसाम, केरळ, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये विशू / बोहाग बिहू / हिमाचल दिन / बंगाली नववर्ष दिन (नबबरशा) निमित्त बँका बंद आहेत.

१८ एप्रिल (मंगळवार) – शब-ए-कदरानिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

२१ एप्रिल (शुक्रवार) – त्रिपुरा, जम्मू आणि श्रीनगर, केरळमध्ये ईद-उल-फितर (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमत-उल-विदा निमित्त बँका बंद आहेत.

२२ एप्रिल (शनिवार) – रमजान ईद (ईद-उल-फितर) आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी ती चालू आहे का, याची खात्री करून जाणेच योग्य ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये