पुणे शहर

वडिलांच्या स्मरणार्थ आयोजित कीर्तन महोत्सवात बापूसाहेब दगडे पाटील यांच्याकडून आरोग्यसेवेसाठी संस्थेस रुग्णवाहिका प्रदान..

बावधन : बावधन आणि परिसर सध्या विठुनामाच्या भक्तीरसात तल्लीन आहे. वडील स्वर्गीय ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त बापूसाहेब दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवामुळे वातावरण भक्तिमय झाले असून दुसऱ्या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी आपल्या कीर्तन सेवेतून समाजप्रबोधनपर मार्गदर्शन केले.

बावधन बुद्रुक मधील तलाठी कार्यालयासमोरील मैदानात या भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बावधनसह आजुबाजूच्या गावांमधील व पुणे शहराच्या उपनगरातील वारकरी संप्रदायातील लोक व विठ्ठल भक्त, नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या शैलीत निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कीर्तन सेवा केली.

Img 20250508 wa00014407724251968801054

यावेळी पिता कै. ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सोहळा आयोजित करणारे बापूसाहेब दगडे पाटील यांनी समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे स्वीय सहाय्यक तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे,  प्रभाकर मोहोळ, लोकसेवा शिक्षण संस्थेचे प्रमुख, माजी आमदार दिपक पायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू युवा प्रबोधिनीचे आरोग्यप्रमुख विशालआण्णा पवार यांना आरोग्यसेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान केली.

यावेळी हिंदू युवा प्रबोधिनीचे ह.भ.प.विश्वास महाराज कळमकर,  दादासाहेब दाभाडे, ॲड. अनिरूद्धजी बनसोड, अरविंद वारूळे,  लोकेशजी कोंढरे यांसह अनेक धर्मरक्षक उपस्थित होते.

Fb img 1757841132875698734583622208205
Img 20250913 wa02065865367835442147326

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये