आपण खबरदारी घ्या…शिवसेना आपली जबाबदारी घेत आहे..!

पुणे: शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार व मित्र-परिवाराच्यावतीने समाजावरती आलेल्या कोविड-१९ च्या आपत्कालीन संकटामध्ये ज्या कोविड योध्यांनी रात्रं-दिवस काम करून समाजाला सुरक्षित ठेवले त्या पोलीस कोविड योध्यांना केलेल्या सेवेबद्दल व दीपावलीच्या निमित्ताने ड्रायफ्रूट बॉक्स चे वाटप शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने करण्यात आले.
हे वाटप कोथरूड पोलीस स्टेशन,अलंकार पोलीस स्टेशन,विशेष शाखा परिमंडळ क्र.(३) पुणे शहर कार्यालय व कोथरूड वाहतुक विभाग पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना करण्यात आले.या प्रसंगी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे,कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(गुन्हे) बाळासाहेब बडे,अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे, अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे, अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजीवन जगदाळे,कोथरूड वाहतुक पोलीस निरीक्षक अजित लकडे, कोथरूड वाहतुक पोलीस उपनिरीक्षक भरत शिवतरे, विशेष शाखा परिमंडळ क्र. (३) पुणे शहर कार्यालय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरूंदकर हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अँड.धर्मराज सुतार, सुधीर वरघडे, नचिकेत घुमटकर,शरद डहाळे,योगेश क्षीरसागर, भूषण माथवड, निलेश मिस्त्री यांनी सहकार्य केले.




















































